Whatsapp

प्रभाग क्र. २६ – आपल्या भागाचे भौगोलिक व सामाजिक महत्त्व पुणे व पिंपरी-चिंचवडला जोडणारा दुवा, संरक्षण विभागाची जवळीक आणि मुंबई–बंगळोर महामार्गाला लागून असलेले स्थान यामुळे आपल्या प्रभागाचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. हिंजवडी आयटी पार्क, ऑटोमोबाईल व चाकण–भोसरी औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कुटुंबांची प्रथम पसंती हा प्रभाग – हीच आपली ताकद! आपल्या भागात सर्व स्तरांतील नागरिकांचे स्नेहपूर्वक सहजीवन आहे. पुढील २५ वर्षांच्या दृष्टीने वाढणारा निवासी व व्यावसायिक विस्तार लक्षात घेता पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, उद्याने, भाजी मंडई आणि इतर मूलभूत सुविधांचे सुयोग्य नियोजन हीच माझी प्राथमिकता आहे. प्रत्येक नागरिकाच्या गरजा समजून प्रभागाचा संतुलित व शाश्वत विकास साधणे — हेच माझे ध्येय.

सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित “न्यू होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा” हा भव्य कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि त्यांच्या कलागुणांच्या झळाळीमुळे हा उपक्रम खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला. या कार्यक्रमाला मा. आमदार सौ. अश्विनीताई लक्ष्मण जगताप, मा. नगरसेविका सौ. मोनिकाताई मुरलीधर मोहोळ आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. स्वप्ना शत्रुघ्न काटे या मान्यवर उपस्थित राहिल्या आणि महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन दिले. मला आनंद आहे की या स्पर्धेत अनेक महिलांनी आपले कौशल्य, आत्मविश्वास आणि उत्साह दाखवत अप्रतिम सादरीकरण केले.

सचिन साठे सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित “दिवाळी पहाट – फराळ” हा सुरेल आणि आनंदमय कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने स्वरधारा म्युझिकल ग्रुप तर्फे सादर करण्यात आलेल्या हिंदी–मराठी गीतांच्या सुरेल मैफलीने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. संगीत, स्नेह आणि उत्साहाने सजलेल्या या दिवाळी पहाट कार्यक्रमाने वातावरण आनंदमय केले. चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार, मा.श्री. शंकरभाऊ जगताप यांनी उपस्थित राहून कलाकारांचे कौतुक केले तसेच सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी परिसरातील नागरिक बंधू भगिनी , जेष्ठ नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपळे निलख व विशाल नगर परिसरातील वाढत्या वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी, सचिन साठे सोशल फाऊंडेशन यांच्या सौजन्याने महत्त्वाच्या चौकांमध्ये ट्रॅफिक वॉर्डन्स नियुक्त करण्यात आले आहेत. दि.१५ सप्टेंबर पासून या उपक्रमाचा शुभारंभ झाला असून, ट्रॅफिक वॉर्डन्स प्रत्यक्ष कार्यरत झाले आहेत. वाहतूक सुरळीत व शिस्तबद्ध करण्यासाठी हा उपक्रम नागरिकांच्या सहकार्याने यशस्वी होणार आहे. सर्व नागरिकांना नम्र आवाहन आहे की, वाहतूक व्यवस्थापनासाठी आपण आपले मोलाचे सहकार्य द्यावे. या शुभारंभ प्रसंगी प्रदीप पाटील (वाहतूक पोलीस निरीक्षक, सांगवी - वाकड विभाग), शिंदे साहेब (पिं.चिं. महानगरपालिका, ड प्रभाग स्थापत्य अधिकारी), भुलेश्वर नांदगुडे, राजाभाऊ मासुळकर, अशोक बालवडकर, संजय दळवी, काळूशेठ नांदगुडे, अनिल संचेती, आनंद कुंभार, अरविंद रणदिवे, नागेश जाधव, संजय पटेल, गोविंद गायकवाड व परिसरातील सर्व मान्यवर व नागरिक उपस्थित होते

भारतीय जनता पक्षाचे नेते, बुलंद नेतृत्व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त भाजप शहराध्यक्ष मा.श्री. शंकरशेठ जगताप यांच्या संकल्पनेतून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात एकाचवेळी ५३,००० झाडांचे वृक्षारोपण महाअभियान राबविले जात आहे.
विशालनगर, पिंपळे निलख येथील रामसृष्टी सह. गृहनिर्माण सोसायटी समोरील मैदानात ही वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.
याप्रसंगी माजी खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष शंकर शेठ जगताप, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, गटनेते नामदेव ढाके, सदाशिव खाडे, गणेश कसप्टे, महिला अध्यक्षा उज्ज्वला गावडे, बहुसंख्येने विद्यार्थी, कार्यकर्ते आणि पिंपळे निलख मधील सन्मानीय नागरिक आदी उपस्थित होते.

निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या पिंपळे निलख येथील, पिंपळवन निसर्ग संवर्धन ग्रुप तर्फे जागतिक वसुंधरा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संरक्षण खात्याच्या अत्यारिखित येणाऱ्या जमिनीवर पिंपळवन निसर्ग संवर्धन ग्रुपमार्फत वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या वृक्षांची निगा ग्रुप मार्फत नियमित राखली जाते.
वसुंधरा दिनाच्या निमित्ताने लागवड केलेल्या वृक्षांना खतपाणी घातले गेले.
तसेच, विशाल नगर परिसरामध्ये निसर्गाच्या संगोपनासाठी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी प्रभात फेरी देखील काढण्यात आली. विशालनगर येथील गणपती चौकामध्ये या प्रभात फेरीचा समारोप करण्यात आला.

समस्त ग्रामस्थ मंडळी पिंपळे निलख यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित होतो.
यंदाच्या हरिनाम सप्ताहाचे हे २४ वे वर्ष आहे.
एका गोष्टीचा मला विशेष आनंद वाटतो की, हरिनाम सप्ताहाच्या सुरुवाती पासूनच मी या उपक्रमाशी जोडले गेलो, पहिल्या वर्षी बाबासाहेब इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली या कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती आम्ही सर्वांनी मिळून लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला पाहून विशेष आनंद होत आहे. पिंपळे निलख मधील तरुण पिढीने देखील अतिशय मनोभावे ही धार्मिक परंपरा कायम ठेवली याचे विशेष समाधान वाटते.
या प्रसंगी, चिंचवड विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप, कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज बोरकर शास्त्री बहुसंख्येने ग्रामस्थ मंडळी, भागवत संप्रदायातील सन्मानीय मान्यवर आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या औचित्याने सचिन साठे सोशल फाऊंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि मिठाई वाटप करण्यात आले. आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करीत असताना, पुढील 25 वर्षांत देशाचे कर्तेधर्ते असणाऱ्या पुढील पिढीच्या शैक्षणिक वाटचालीत हातभार लावावा अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांची या उपक्रमा मागील भूमिका होती. पिंपळे निलख परिसरातील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत, पर्ल ड्रॉप हायस्कूल तसेच विशाल नगर आणि कस्पटे वस्ती येथील महानगरपालिकेच्या शाळेत, विशाल नगर मिल्की वे हायस्कूल या शाळांमध्ये प्रथम टप्प्यात हा उपक्रम राबविण्यात आला. या प्रकारे 4000 विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करण्याचे सचिन साठे सोशल फाऊंडेशनचे उदिष्ट आहे .